Gold Basil Ayurveda

Gold Basil Ayurveda

Share

Pure, Premium, Ayurveda

29/10/2024

दिवाळी म्हटलं की आठवते ती पहिली आंघोळ.... आणि पहिली आंघोळ म्हटलं की आठवतं ते कडकडत्या थंडीत तेल आणि उटणं लावून केलेलं अभ्यंग स्नान.
तेल आणि उटणं लावून केलेलं स्नान म्हटलं तर एक छोटासा विधी किंवा "शास्त्र असतं ते" असं म्हणणाऱ्यांसाठी एक निमित्त ...पण काही म्हणा दिवाळीच्या दिवशी उटणं लावून आंघोळ केल्याने त्या दिवसाची सुरुवात एका वेगळ्याच प्रकारचा आनंद देते.
उटण्याशिवाय दिवाळीतली पहिली आंघोळ हा विचारच करता येत नाही. उटणं का लावावं?
ज्यावेळी साबणाचा शोधच जगात लागलेला नव्हता त्यावेळी राजघराण्यातील लोक उटण्याने स्नान करत असत. केवळ सुगंधी चूर्ण अंगाला लावणं हा त्यामागचा उद्देश नसून त्यामागे कितीतरी फायदे आहेत.
उटण्याच्या नियमित वापराने रक्ताभिसरण सुरळीत होतं त्वचेवरील मृतपेशींचा थर निघून जातो त्यामुळे कितीतरी प्रकारचे त्वचा रोगांपासून आपले संरक्षण होते, त्वचा चमकदार व मुलायम
राहते व त्वचेमध्ये आवश्यक त्या वनौषधींच्या सुगंधित चुर्णमुळे दिवसभर मनाला प्रसन्नता वाटते आणि त्यात असलेल्या विशेष वनौषधीमुळे आपल्या शरीराचा aura किंवा एनर्जी लेवल ही शुद्ध राहते.
गोल्ड बेजील आयुर्वेदाचे अभ्यंगम उटणे हे गेल्या काही वर्षात ग्राहकांची एकमेव पसंती बनली आहे.उत्कृष्ट दर्जा,सात्विक मंद सुगंध यामुळे दिवाळीची सुरुवात खूपच प्रसन्न होते यात शंकाच नाही.
यातील वाळा, नागरमोथा ,गुलाब ,संत्रा साल ,कचुरसुगंधी, बावची ,सारीवा, मंजिष्ठा अशा अनेक वनौषधींचे योग्य मिश्रण आपल्या सौंदर्याला आणि आरोग्याला अनेक फायदे करून देतात.
आजच मागवा अभ्यंगम प्रीमियम सुवासिक उटणे आणि द्या आपल्या प्रियजनांना एक भेट ....जिव्हाळ्याची,

29/09/2021
Want your business to be the top-listed Beauty Salon in NAVI MUMBAI?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Mumbai
Navi Mumbai
400706